उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे
कोगनोळी : आप्पाचीवाडी येथील ग्राम पंचायत अध्यक्षपदी शालन चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शिशु अभिवृद्धी योजना अधिकारी डी. बी. सुमित्रा यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून पीडीओ लक्ष्मण पारे, सेक्रेटरी संजय खोत, क्लार्क विपीन चव्हाण यांनी सहकार्य केले.
यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
यावेळी नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा शालन चव्हाण यांचा डी. बी. सुमित्रा यांच्या हस्ते तर नूतन ग्रामपंचायत उपाध्यक्ष आनंदा कुवाळे यांचा लक्ष्मण पारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव खोत, तुकाराम शेटके, ए. जी. माने, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा यादव यांची शुभेच्छापर भाषणे झाली. नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कुवाळे यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे, सतिश मगदूम, सागर लोहार, लक्ष्मण आबणे, किसन पोटले, तुकाराम शेटके, अमोल काळे, मंगल पाडेकर, उमा कांबळे, अन्नपूर्णा पोवार, मंगल जाधव, विद्या राऊत, भाग्यश्री कांबळे, यांच्यासह संजय चव्हाण, गौतम पोवार, संजय देशपांडे, सुधाकर राऊत, धनाजी पाडेकर, संदीप कांबळे, मारुती केसरकर, लक्ष्मण कुळवमोडे, शिवाजी नुले, मधुकर पोटले आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे यांनी आभार मानले.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …