Friday , October 18 2024
Breaking News

बोरगाव वादळात सापडलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना ‘अरिहंत’तर्फे मदत

Spread the love
नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलेल्या वचनाची पूर्तता : लाखोंची मदत
निपाणी(वार्ता) : चार दिवसापूर्वी बोरगाव शहर परिसरात वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये अनेक घरांचे छत उडून जाऊन अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. या घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या नुकसानीची भरपाई म्हणून बोरगाव येथील सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने युवा नेते उत्तम पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाकडून स्वतः आर्थिक सहाय्य करत छतावरील पत्र्यांचे वाटप करून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या या कार्याचे बोरगाव आणि निपाणी परिसरात कौतुक होत आहे.
वादळी वारा आणि वळीव पावसाच्या दणक्यात बोरगाव शहरातील माळ भागातील अनेक कुटुंबियांच्या संपूर्ण घरांची छते कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबियांच्या घरावरील पत्रे-कौले तोडून मोडून पडली. शिवाय  अनेक कुटुंबियांनी बँकांचे कर्ज काढून बांधलेल्या  नवीन घरात कुटुंबियांनी पाय सुद्दा न ठेवण्या अगोदरच वादळाच्या माऱ्यात काही घरे भुईसपाट झाली. याची दखल घेऊन शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता युवा नेते उत्तम पाटील यांनी स्व खर्चातून अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी  धाव घेऊन ३१ कुटुंबियांना लाखोंची मदत करत  आर्थिक मदतीचा हात देत नुकसानग्र कुटुंबियांना दिलासा दिल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
युवा नेते उत्तम पाटील यांनी वादळातील आपद्ग्रस्ताना मदत करताना वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घराच्या नासधूस साहित्याची पूर्तता केली आहे. तर काहींना आर्थिक स्वरूपात सहकार्य करून पुढेही सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
यावेळी नगरसेवक अभय मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, तुळशीदास वसवडे, दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने-पाटील, पिंटू कांबळे, शोभा हवले, सुवर्णा सोबाणे, भारती वसवाडे, वर्षा मनगुत्ते, संगीता शिंगे, अश्विनी पवार, गिरीजा वठारे, रुक्साना अफराज, राजू पाटील, किरण पाटील, आण्णासाहेब ढोगे, रजनीकांत बन्ने, शयांच्यासह  मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *