Tuesday , March 3 2026
Breaking News

अंबिका तलावाचे रक्षक बनले उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते

Spread the love

कोगनोळी : येथील गांवाच्या मध्यभागी असलेल्या अंबिका तलावाची मोठी दुरवस्था निर्माण झाली होती. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते.
अंबिका देवी, राम मंदिर, हनुमान मंदिर, कालिका देवस्थान येणार्‍या भावी का सह तलावा लागत असणार्‍या ग्रामस्थ व व्यापार्‍यांना या तलावाच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
संबंधित तलावाची दुरावस्था या आशयाची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. ग्रामपंचायतीने तात्पुरती डागडुजी करून स्वच्छ करण्याचे नाटक केले होते. पण तलावातील स्वच्छता न झाल्याने दुर्गंधीचे साम्राज्य आहे तसेच होते. या तलावाला उत्तम पाटील ग्रुपचे कार्यकर्ते रक्षक म्हणून धावून तलावाची स्वच्छता केली. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने या ठिकाणी तलावाची स्वच्छता करून पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते पण तसे न होता कामचलाऊ पना दाखवून स्वच्छता करून मुख्य हेतू बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकातून ग्रामपंचायतीवर नाराजी पसरली आहे.
या तलाव स्वच्छता अभियानामध्ये जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, सचिन परीट, विठ्ठल मुरारी कोळेकर, ग्राम पंचायत सदस्य सुमित माने, कुमार मानगावे, निलेश मगदूम, संतोष पाटील, सुनील काशीद, अरुण पाटील, सौरभ कगुडे, महादेव डोंगळे, राहुल माने, यांच्यासह अरिहंत ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *