अमर बागेवाडी : दोन दिवस घेतला प्रगतीचा आढावा
निपाणी (वार्ता): बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाला मंगळवारी (ता. 29) व बुधवारी (ता. 30) या दोन दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळ (नॅक) कमिटीने भेट दिली. दोन दिवसांत नॅक कमिटीने महाविद्यालयाचा दर्जा, गुणवत्तेसह सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व परिस्थितीची पाहणी करून या कमिटीने सलग तिसर्या वर्षी या महाविद्यालयाला ’नॅक’ कमिटीने ’ए’ मानांकन दिल्याने महाविद्यालयाने हॅट्ट्रिक साधल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अमर बागेवाडी यांनी बुधवारी (ता.6) दुपारी दिली.
अमर बागेवाडी म्हणाले, मूल्यमापन कमिटी भेटीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील तयारी पूर्ण केली होती. यापूर्वी महाविद्यालयाने ’ए’ मानांकन प्राप्त केले होते. यावेळीही ’ए’ मानांकन मिळेल, असा विश्वास महाविद्यालयातील सर्व घटकांना होता. शिवाय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कोरे यांचे सहकार्य लाभले. नॅकच्या तीन सदस्यीय कमिटीमध्ये तेलंगणा विद्यापाठीचे माजी कुलगुरू प्रा. बी. गोपाल रेड्डी, पुणे विद्यापीठातील गणित विभागाचे प्रा. विलास खरात आणि तमिळनाडूतील एपीसी महालक्ष्मी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सत्यभामा कुलातू यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी प्राचार्यांनी, नॅक संयोजक यांच्याशी संवाद साधला. दुसर्या दिवशी महाविद्यालयातील सुरक्षा इंधन, पाणी पुरवठा व्यवस्थेसह मुलभूत सुविधा आणि विविध विभागांची माहिती कमिटीने घेतली होती. त्यानुसार या महाविद्यालयाला ’ए’ मानांकन देण्यात आले आहे. तसेच यावेळी संशोधनात्मक कार्य करण्यावर भर देण्याचे आवाहन कमिटीने केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, नॅक संयोजक डॉ. बी. एस. कांबळे, निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे, उपप्राचार्य डॉ. आर. जी. खराबे, कन्नड विभाग प्रमुख प्रा. विजय धारवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. एम. रायमाने व प्राध्यापक उपस्थित होते.
Check Also
नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक
Spread the love जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …