Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठीचा दुसरा मुक्काम सौंदलगात

Spread the love


सौंदलगा : बेळगाव येथील चव्हाट गल्ली येथील कै. इराप्पा धुराजी यांच्या भक्तिमार्गातून इ.स.1800 मध्ये या सासनकाठीची परंपरा सुरू असून त्यावेळेपासून चव्हाट गल्ली व बेळगाव येथील लोक बैलगाडीसह सासनकाठी घेऊन चैत्र एकादशी दिवशी जोतिबा डोंगरावर दाखल होतात. जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाच्या जवळ आल्यानंतर तेथील गुरव (पुजारी) सासनकाठीची पुजा, आरती, मनाचा विडा दिला जातो. दक्षिण दरवाज्यापासून सासनकाठीला सुरुवात झाल्यानंतर मूळ मंदिरापर्यंत सर्व गुरव समाजाकडून आरती केली जाते. देवदादा सासनकाठी जोतिबा डोंगरास नेणारी ही सहावी पिढी असून त्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
बेळगाव येथून गुरुवारी (ता.7) चव्हाट गल्लीतील देव घरातून वाजत-गाजत सासनकाठी डोंगराकडे प्रयाण झाली. पहिला मुक्काम संकेश्वर येथे केला असून, दुसरा मुक्काम श्री नृसिंह मंदिर सौंदलगा येथे केला आहे. तिसरा मुक्काम गोकुळ शिरगाव येथे असून, कोल्हापूर पंचगंगा नदीस नैवेद्य दाखवून, वडणगे येथे चौथा मुक्काम आहे. कामदा एकादशी दिवशी डोंगर चढण्यास सुरुवात होते. त्यादिवशी एकादशीचा उपवास करत डोंगर चढतात. डोंगरावरील मंदिराच्या जवळ बेळगावकरी तळे येथे जागेवर पौर्णिमेपर्यंत मुक्काम असतो. तेथे पौर्णिमेपर्यंत दररोज श्री जोतिबा देवास नैवेद्य, बेळगावकरी तळे येथे महाप्रसाद असतो. (या सासनकाठी समवेत आठ बैलगाडी, एक मानाचा नंदीसह एकूण पायीप्रवास करणारे 70 भाविक असून त्यामध्ये सात वर्षाच्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत भाविक आहेत.) या सासनकाठीचे वारस शांताबाई धुराजी असून सासनकाठीचे पुजारी लक्ष्मण किल्लेकर आहेत. या सासनकाठी समवेत प्राचार्य आनंद आपटेकर, नागेंद्र नाईक, मदन कामुले, अभिजीत किल्लेदार, ज्योतिबा किल्लेकर, सागर मुतगेकर, प्रभाकर जाधव, अनिकेत घोरपडे (डवरी बुवा), सोन्या किल्लेकर, श्रीनाथ पोवार, गिरीश पाटील, नामदेव नाईक व इतर भाविक यात्रेस जात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *