कोगनोळी : येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नवीन पाईपलाईनचा शुभारंभ संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते.
ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गावात संपूर्ण नवीन पाईपलाईन करण्यात येणार आहे. यामुळे गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीत शासनाकडून आलेला निधी नागरिकांच्या योग्य सोयी-सुविधा साठी उपयोग करण्यात येत आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी आपापल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सदस्य युवराज कोळी, तात्यासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष पुनम उर्फ ज्ञानेश्वर डांगरे, धनंजय पाटील, प्रवीण भोसले, राजू शिंत्रे, महेश जाधव, संजय खोत, रामदास गाडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र
Spread the love निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार …