
काँग्रेसतर्फे मागणी : शहर पोलिसांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजामधील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन चिक्कोडी जिल्हा काँग्रेस, निपाणी व बेडकिहाळ भाग काँग्रेसतर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी यांच्या प्रमुख उपस्थिती मंगळवारी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर यांना देण्यात आले. त्यावेळी चिंगळे बोलत होते.
निवेदनातील माहिती अशी, बंगळुरू येथे चंद्र नामक व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. पण गृहमंत्र्यांनी खरी माहिती न देता मुलाखतीमधील माहितीद्वारे खून झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जातीय धर्म आणि समाजामधील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे अशांती निर्माण करणाऱ्या या मंत्र्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, विजय शेटके, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शेरू बडेघर, संजय पावले, रोहन साळवे, राजेंद्र चव्हाण, निकु पाटील, माजी सभापती किरण कोकरे, विश्वास पाटील, राजेंद्र चव्हाण, राजन चिकोडे, अरुण आवळेकर, सचिन पोवार, अनिस मुल्ला, युवराज पोळ, संजय पाटील, बाळासाहेब कमते, झुंजार दबडे काशीमखान पठाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta