
विमला कदम : ग्रामपंचायत स्वच्छता अभियान
कोगनोळी : घर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा साठवून ठेवू नका, सांड पाण्याचा योग्य निचरा करा, शौचालय स्वच्छ ठेवावे, रोगापासून दूर राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून घर व परिसर व गटार स्वच्छ ठेवावा, रोज वापरण्यात येणार्या प्लास्टिक व अन्य साहित्य कचरा संकलन करणार्या गाडीतच टाकावे, ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवून ग्रामपंचायतीकडून येणार्या गाडीतच टाकावे असे मनोगत स्वच्छता अभियान अधिकारी विमला कदम यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित स्वच्छता अभियान अंतर्गत त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे होते.
लिपिक अवि हळिज्वाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत सेक्रेटरी संजय खोत, अनिल माने, रामराव जाधव, शरद कोळी, संजय कुंभार, शिवलिंग दिवटे, उज्वल शेवाळे, अनिल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta