अनेक शाळाखोल्या धोकादायक
निपाणी (वार्ता) : चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पाऊस, महापूर तसेच अन्य कारणामुळे १४०० पेक्षा जास्त शाळा खोल्यांची दुरावस्था झाली आहे. येत्या पावसाळ्याच्या आत सदर खोल्या दुरुस्त कराव्यात. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी शिक्षण स्थायी समिती सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी दिली. सलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शाळांना सुटी देण्यात आल्या होत्या. शिवाय या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि महापूर याचा फटका शाळांना बसला आहे. ५.५ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात १०३७ शाळा खोल्यानिर्माण करणे गरजेचे आहे. बेळगाव तर शैक्षणिक जिल्ह्यात ४५७ शाळा खोल्या नव्याने बांधणे गरजेचे आहे. काही शाळांमध्ये वर्ग खोल्या अपुऱ्या पडत आहेत. २०१ ९ ते २०२१ या काळात महापुरामुळे आणि अति पाऊसमुळे चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात १४०० पेक्षा जास्त वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या होत्या. त्यावेळी महापूर परिहार निधीतून १४०० पैकी ९९१ खोल्या नव्याने बांधण्यात अथवा दुरुस्त केल्या आहेत. तर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात ६०० पैकी ४५५ खोल्या करण्यात आल्या नूतनीकरण आहेत. तर अद्याप दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यात मिळून १४९५ खोल्या नूतनीकरण करणे गरजेचे असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …