
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या आरटीओ ऑफिसनजीक क्रुझर व मोटरसायकल यांचा अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 29 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, क्रुझर गाडी क्रमांक केए 24, 3749 निपाणीहून औद्योगिक वसाहतीकडे जात होती. याचदरम्यान स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम 09 एफ एफ 1649 घेऊन माणिक मुरलीधर पाटील (वय 26) राहणार सौंदलगा हे औद्योगिक वसाहतीकडे जात होते. क्रुझर व मोटर सायकल अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. क्रुझर रस्त्याच्या मधोमध पलटी झाली. यामध्ये दहा प्रवासी होते यातील तिघेजण जखमी झाले. मोटरसायकलस्वार माणिक पाटील यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. आय. कंबार, शिवप्रसाद, राजू गोरखनावर, संदीप वडर, पी. डी. घस्ती यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.
Belgaum Varta Belgaum Varta