
महेश जाधव यांचा आरोप
कोगनोळी : अंगणवाडीमध्ये पुरवलेल्या धान्यामध्ये काही ठिकाणी उत्तम दर्जाचे तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत आहे.
याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी केली आहे.
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोगनोळी हणबरवाडी, दत्तवाडी, कुंबळकट्टी इत्यादीसह परिसरात बारा अंगणवाडीचा समावेश आहे. या बारा अंगणवाड्यांना गूळ, तेल, साखर, मूग, तूर, डाळ, चटणी, मसाले इत्यादी सारखे पदार्थ पुरवले जातात.
यामध्ये काही पॅकेटमधून मसाले पदार्थ येतात तर काही खुले पदार्थ येतात. ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी नुकतीच कोगनोळी येथील आपल्या प्रभागातील अंगणवाडीला भेट दिली. अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात आलेले तिखट व वेगवेगळ्या डाळी या पूर्णता निकृष्ट दर्जाच्या असून यामुळे मुलांचे व गर्बिनी महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांच्या पोषणासाठी की कुपोषणासाठी अशा प्रकारचा धान्याचा पुरवठा केला आहे. असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या धान्य पुरवठा करणार्या ठेकेदाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी. अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी महेश जाधव यांनी दिला.
यावेळी अन्य काही अंगणवाडी मध्ये चौकशी केली असता यापूर्वी खूप निकृष्ट दर्जाचे धान्य व मसाले येत होते पण आता त्यातल्या त्यात बरे असल्याच्याही प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर काही पालकांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत कोगनोळीमध्ये अंगणवाडीला पुरवल्या जाणार्या या निकृष्ट पदार्थांची चौकशी होणार का याकडे आता सर्वांचे नजरा लागल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta