
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 15 मे रोजी भव्य “गुरुवंदना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बेळगावातील मराठा समाजातील प्रमुखांनी जनजागृती सुरू केली आहे. निपाणी, संकेश्वर, कोगनोळी, उगार, अथणी आदी भागातील मराठा समाजातील प्रमुखांनी किरण जाधव यांच्याशी संपर्क करून कार्यक्रमाच्या जनजागृतीबाबत चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. या भागातील मराठा समाजातील जास्तीतजास्त नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान, किरण जाधव म्हणजे की, मराठा समाजाच्या उन्नतिसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून आपल्या समाजातील तरुणांना याचा लाभ होईल. समाज एकत्रित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी “गुरुवंदना” कार्यक्रम यशस्वी करू.

यावेळी प्रताप जत्राटे, निरंजन पाटील, रुपेश माने, बाजीराव घाटगे, प्रकाश गायकवाड, नानासाहेब आवताडे, रवींद्र शिंदे, युवराज पाटील, नेताजी भोसले आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta