कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, कुर्ली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कोगनोळी तालुका निपाणी येथे सोमवार तारीख दोन रोजी सकाळी सात वाजता पारगगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवज्योत गावातील प्रमुख मार्गावरून अंबिका मंदिर येथे आणण्यात आले.
दुपारी बारा वाजता ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरात किर्तन भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुंठवडा वाटप करण्यात आला. महिलांनी पाळणा गीत गायले. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करण्यात आला.
सायंकाळी पाच वाजता माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, लक्ष्मण चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, रोहन साळवे, राजेश कदम, पंकज पाटील, मराठा मंडळाचे अध्यक्ष शामराव माने, उपाध्यक्ष उमेश पाटील आदीसह अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिव प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही सवाद्य मिरवणूक महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, सुतार गल्ली, मगदूम गल्ली, माळी गल्ली, चव्हाण गल्ली, गायकवाड गल्ली, पूर्णानंद महाराज मठ, काशिद गल्ली, मेन रोड अंबिका मंदिराजवळ आणून या भव्य मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, संजय पाटील, संदीप डोंगळे, धनाजी पाटील, युवराज पाटील, केशव पाटील, संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले, प्रकाश गायकवाड, महेश पाटील, सी. के. पाटील, अनिल चौगुले, युवराज कोळी, पुनम डांगरे, किरण चौगुले, दादासाहेब माने, विश्वजीत गायकवाड, अभिषेक भोसले, करण जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, अरुण पाटील, बाळासाहेब कागले, बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, अनिल पाटील, किरण जाधव यांच्यासह शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …