
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक मंडळ व प्राचार्यातर्फे विविध उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. यावेळी सिंधुदुर्ग किल्यावरुन आणलेल्या ज्योतीचे स्वागत प्रा. डॉ. अमर चौगुले यांनी केले. शिक्षक शिक्षिकांनी शिवज्योत घेऊन श्रीनगर परिसरात फेरी काढली. त्यानंतर शाळेचे संस्थापक डॉ. अमर चौगुले व प्राचार्या चेतना चौगुले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
कार्यक्रमात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करुन अभ्यासपूर्ण शब्दांमध्ये महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. अव्दैत चौगुले, विवान भोसले, शिवतेज पठाडे, चिन्मय लोळसुरे या विद्यार्थ्यांनी बाल शिवाजीच्या भूमिका साकारल्या होत्या. कार्यक्रमास शिक्षक मारुती महाजन, ज्योती चवई, स्वाती पठाडे, संध्या भोसले, पुजा वसेदार, निखिता ऐवाळे, माधुरी लोळसुरे, शिल्पा तरळ, नाझनी होसुर, पल्लवी कांडणे, अस्मिता चिखलीकर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले. हर, हर, महादेवच्या शिवगर्जनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta