
निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये गेले अनेक वर्ष सिद्धोजीराजेंनी दिलेली
शिकवण पुढे त्यांच्या भावी पिढीने चालू ठेवली आहे. निपाणकर राजवाड्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त सर्व जाती, धर्मातील सत्पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी श्रीमंत विजयराजे निपाणकर, प्रकाश मोहिते, गुलजार सातारे, रवी कोडगी, संग्राम हेगडे, राजेंद्र मंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन चंद्रकांत तारळे, महान अवलिया पैगंबर यांचे प्रतिमेचे पूजन श्रीमंत दादाराजे निपाणकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अल्ताफ कोल्हापुरे, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे अशोक सूर्यवंशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रवीप्रसाद आवटे यांच्या हस्ते झाले. श्रीमंत धनदीपराजे निंबाळकर यांच्या हस्ते आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रमास प्रतीक तारळे, श्रीमंत राजेशराजे निपाणकर, समीर सातारे, श्रेयश हेगडे, संदीप पडवळे, अशोक सूर्यवंशी, प्रकाश मोहिते, अल्ताफ कोल्हापुरे, रवीप्रसाद आवटे, सुजित सिंह गायकवाड, अमोल भोसले व मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे सरकार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta