Saturday , October 19 2024
Breaking News

बुरुजाच्या प्रतिमेवरील मंत्रीमहोदयांच्या छायाचित्रांमुळे शिवप्रेमींतून संताप

Spread the love


नवनाथ चव्हाण : शिवप्रेमींची माफी मागावी
निपाणी (वार्ता) : हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत. अनेक गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी विविध लढाया केले आहेत. त्यामुळे ते सर्वांच्या मनामनात कायमचे आहेत. त्यांची प्रेरणा घेऊनच मराठा समाजाची वाटचाल सुरू आहे. असे असताना शिवजयंती मिरवणुकीच्या निमित्ताने केलेल्या बुरुजाच्या प्रतिमेवर मंत्रीमहोदय आणि खासदारांची छायाचित्रे लावणे, जाहिरातीच्या फलकावर नगरसेवकांची छायाचित्रे वरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र खालील लावणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पेक्षाही हे राजकारणी मोठे असल्याचे भासवत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा अपमान झाला असून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे असे फलक तात्काळ हटवून शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी स्वराज्यरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांनी केली. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शनिवारी (ता.७) दुपारी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
नवनाथ चव्हाण म्हणाले, दोन दिवसापूर्वी मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती आणि शिव मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये कोणतीही जाहिरातबाजी न करता शिवप्रेमी यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यात आले. पण शनिवारी आयोजित शिव मिरवणूक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा अवमान करण्याचे प्रसंग जाहिरात बाजी मधून दिसून आले. शहराच्या विविध रस्त्यावर दुतर्फा असे फलक लावून त्यावर वरील बाजूस स्वतःचे तर खालील बाजूस विविध महापुरुषांची छायाचित्रे लावली आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मावळे आणि या महापुरुषांचा अवमान झाला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील शिवप्रेमीमधून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी शिवप्रेमींची माफी मागावी अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही नवनाथ चव्हाण यांनी केले.
यावेळी प्रदीप सातवेकर, प्रकाश इंगवले, उत्तम कामते, अमोल जाधव, स्वप्नील कोळी, संदीप इंगवले, विनय कामते, सचिन लोकरे, प्रशांत नाईक, झुंजार दबडे, अरुण दबडे, शिवम जासूद यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *