मोतीवाला सेवा संस्थेकडून सरबत वाटप :शिव-बसव प्रेमींतून समाधान
निपाणी : जोल्ले उद्योग समूहातर्फे भव्य शिव-बसव जयंती मिरवणूक सोहळा पार शनिवारी (ता.७) पडला. यावेळी निपाणी शहर व ग्रामीण भागातील हजारो शिव-बसव प्रेमींनी उपस्थित राहून याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. याप्रसंगी १० हजारावर शिव-बसव प्रेमींना मोफत पाणी तसेच ज्यूस वाटप करून स्वर्गीय रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला सामाजिक सेवा संस्थेने मानव सेवा व एकतेचा संदेश दिला. रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. याशिवाय जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून मुस्लिम बांधवांनीही एकत्र येवून सरबत आणि पाण्याचे वाटप केल्याने शिव- बसव प्रेमीमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी या पाणी व ज्यूस वाटप स्टॉलला भेट देऊन आणि ज्यूसचा आस्वाद घेतला. यावेळी मोतीवाला सामाजिक सेवा संस्थेने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून संस्थेच्या यापुढील उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक जुबेर बागवान, प्रवीण सुतार, मलिक जमादार, जावेद फलटणकर, फय्याज पठाण, सर्फराज सय्यद, राजू बागवान, अमृत कुरले, अजय कमलकर, दिगंबर सुतार, विनायक सुतार, अन्फाल शेख, एजाज बागवान,तोहिद पठाण, समीर बागवान, युसुफ पठाण, अजमद पठाण, आफान पठाण, खली चावलवाले आतिफ पठाण, आसिफ बागवान, अनिस सौदागर, मज्जिद बागवान, सनी जाधव, अभी काटे, आकाश पोटले, विनायक परीट यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
मावळ्याबरोबर घेतले फोटो
गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदू-मुस्लीम यांचा वाद विकोपाला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शिव बसव जयंती मिरवणुकीत सरबत आणि पाणी वाटप करणाऱ्या मुस्लिम युवकांनी मावळा बरोबर फोटो काढून घेऊन सामाजिक सलोखा जोपासला.