सौंदलगा : सौंदलगा येथे रक्षाविसर्जन नदीत न करता नवीन झाड लावून त्या रोपास रक्षा घालून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न डोंगर भागातील युवक वर्गाकडून होत असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रक्षा विसर्जन नदीत करून जल प्रदूषण होत आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. याचा विचार करून डोंगर भागातील युवक वर्गाने नदीमध्ये रक्षा विसर्जन न करता सौंदलगा स्मशानभूमी शेजारी वृक्षारोपण करून त्या झाडास ती रक्षा टाकल्यानंतर त्याचीही वाढ होणार आहे व मयत व्यक्तीची आठवणही कायमस्वरूपी राहणार आहे, असा युवक वर्गाने विचार केला. डोंगर भागातील रहिवासी अरुण लोहार यांच्या मातोश्री श्रीमती सुलाबाई लोहार यांचे निधन झाले. त्या लोहार कुटुंबियांना या उपक्रमाची माहिती सांगितल्यानंतर त्या कुटुंबियाने या उपक्रमाला मान्यता दिली. त्यानूसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये खड्डा खणून त्यात रक्षा विसर्जनाची राख घालून वृक्षारोपण केले. राखीमुळेही वृक्ष वाढीसाठी चांगला वापर होतो. त्या वृक्षारोपणानंतर त्याची निगा राखण्याची जबाबदारी या युवकांनी घेतली आहे. असाच प्रतिसाद नागरिकांकडून मिळाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे युवकाने सांगितले.
यावेळी डॉ. संदीप गोरंबे, मारुती लोहार, गोरख कुंभार, भास्कर कुंभार, अनिकेत सूर्यवंशी या युवकांनी उपक्रमास सुरुवात केली आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …