वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम
निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम करण्याचे ठरविले आणि हा कार्यक्रम एक सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा, या उद्देशाने बोरगांव येथील सरकारी शाळेसाठी प्रवेशद्वारची निर्मिती करून शाळेला भेट देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे.
प्रारंभी शिवाजी भोरे यांनी स्वागत केले. तर शिवानंद राजमाने यांनी प्रस्ताविक केले. 1991 ते 2001 या सालातील वर्गमित्रांनी आपला स्नेहसंमेलन करण्याचे ठरवून येथील के. एस. पाटील माध्यमिक शाळेत स्नेहसंमेलन साजरा केला. वर्गमित्रांनी स्नेहसंमेलन साठी लागणाऱ्या खर्चाबाबत सर्वांकडे वर्गणी घेऊन मिळवलेल्या वर्गणीतून एक सामाजिक उपक्रम हाती घ्यावे, या उद्देशाने येथील सरकारी शाळेला सुमारे 50 हजार रुपये पेक्षाही अधिक खर्च करण्यात आले आहे.
याठिकाणी कन्नड, मराठी व उर्दू या तीन शाळा आहेत. या शाळेला संरक्षक भिंत आहे. पण त्याला प्रवेशद्वार नव्हते. यामुळे या ठीकाणी शाळेची मोड तोड करणे, असे अनेक गैरप्रकार घडत होते. याची दखल घेऊन या प्रवेशद्वाराची निर्मिती केली आहे. महिला शिक्षिकांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व शिक्षणप्रेमी मारुती निकम, एस. एल. लमानी, रामचंद्र पवार, नवाज कापसे, सचिन कुरळे यांच्या व्ही. ए. अडके यांच्या हस्ते फीत कापून प्रवेशद्वाराचे लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी शाळेतील वर्गमित्रांनी शिक्षकाबद्दल आदर व्यक्त केला. याप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष रमेश वास्कर, सविता चौगुले, माजी मुख्याध्यापक एस. बी. पाटील, एम. आर. कांबळे, एस. एल. लमानी, आर. ए. इंगळे, अशोक सुतार, गीता माने, व्हीं. व्ही. नाईक, भारती महाजन, आर. एस. कोळी, आर. डी. नेजे, वनिता चौगला, लीला शेटके, के. बी.जमादार, मराठी शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. पकाले, कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. देशमुख, अर्चना भादुले, यांच्यासह शाळा समिती सदस्य, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. मोहन पाटील यांनी आभार मानले.