प्रकाश हुक्केरी :वायव्य शिक्षक मतदार संघ निवडणूक
निपाणी (वार्ता) : वायव्य शिक्षक पदवीधर मतदारसंघातून केवळ शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठिंच्या सल्ल्यानुसार उमेदवारी स्विकारली आहे. शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची ग्वाही माजी खाससदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. आडी येथील सर्वेज्य सांस्कृतिक सभाभवनात आयोजित शिक्षक मतदरांच्या बैठकीत बोलतांना दिली.
ते म्हणाले, चिकोडी, निपाणी भागातील शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या असून सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अथणी, रायबाग, कुडची विभागातील भेटी -गाठी सुरू आहेत. बहुतांशी शिक्षक मतदारांनी आपणाला पाठिंबा दिला आहे. निवडून आल्यानंतर आपण शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, वायव्य शिक्षक मतदारसंघाला प्रथमच सर्वांच्या संपर्कातील, थेट समस्येला भिडून ती सोडविण्यासाठी काम पूर्ण करणारा उमेदवार भेटला आहे. मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता पहिल्या पसंतीचे एकच मत प्रकाश हुक्केरी यांना द्यावे.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, शिक्षक नसलेला, परंतु सर्व क्षेत्रात उमेदवार पक्षाला मिळालेला आहे. सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची क्षमता ठेवणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांच्या पाठीशी नेटाने राहून त्यांना पहिल्या पसंदीचे मतदान करून निवडून द्यावे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, पहिल्यांदाच तालुक्याला शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य मिळणार आहे. समस्या सोडवण्यासाठी वेळ देणारा प्रतिनिधी शिक्षकांना मिळाला आहे. सर्वांनी प्रकाश हुक्केरी यांच्या पाठिशी ठामपणे राहून त्यांना निवडून घेण्याचे आवाहन केले. यावेळी लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम, बसवराज पाटील, रावसाहेब जनवाडे, एस. एस. चौगुले, एस. पी. गुळगुळे, विद्यावती जनवाडे, डॉ. बी. ए. माने यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, राजेंद्र वड्डर, बी. आय. माने, आण्णासाहेब हावले, महावीर मोहिते, वाय. बी.. हंडी, ए. आय. पिरजादे, प्रदिप जाधव, दिलीप उगळे, अमर शिंत्रे, रमेश भिवसे, दिलीप पठाडे, उपप्राचार्य एम.एम.बागवान, प्रा. आर. के. दिवाकर, आर. ए. पाटील, प्रकाश काशिद, विलास खोत यांच्यासह शिक्षक मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. राजू खिचडे यांनी आभार मानले.