निपाणी (वार्ता) : कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर, कर्नाटक ओलंपिक असोसिएशन, बेळगाव जिल्हा असोसिएशन, यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथे सद्गुरु तायकांदो स्पोर्ट्स अकादमी मार्फत तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षा रविवारी (ता.15) केएलई सीबीएसई शाळेत पडल्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
यलो बेल्ट विभागात ओम पाटील, प्रांजल उन्हाळे, आराध्या ज्वारे, आरोही ज्वारे, अनिकेत ज्वारे, अदित्य ज्वारे, मल्लिकार्जुन झरे, महादेव झरे, अवनी व्हदडी.
ग्रीन बेल्ट विभागात प्रथमेश श्रीखंडे, यल्लेश वराग, प्रतिक्षा नायक, कृतिका ऐनापुरे, सोनल लिगाडे, श्लोक लिगडे, बल्लाळेश्वर मिरजे, सारंग अक्की, धन वर्षा देसाई यांनी यश संपादन केले.
ग्रीन वन विभागात प्रज्वल नायक, शुभम ऐनापुरे, शांभवी कारंडे, अनन्या ऊगारकर,
ब्ल्यू बेल्टमध्ये विधान श्रीपणावर.
ब्ल्यू वन विभागात साहिल माळगे, समर्थ निर्मले.
रेड वन विभागात कनिष्क सत्यनायक, ओमकार अलकनूरे आदींनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षांमध्ये मुला-मुलींच्या कडून स्वसंरक्षण, प्रशिक्षण टाइल्स बेकिंग, पूमसे, फाईट, रनिंग, लांब उडी, उंच उडी, शारीरिक व मानसिक चाचणी करून घेण्यात आली. या परीक्षेचे परीक्षक म्हणून राष्ट्रीय पंच प्रवीण पाटील-संकेश्वर यांनी काम पाहिले. मुख्य प्रशिक्षक बबन निर्मले, प्रशिक्षक विजय नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी गणेश हूलकंथी, अनुष्का चव्हाण, प्रथमेश भोसले, आदित्य सोलापूर, देवराज मल्हाडे यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्य शर्मिष्ठा रॉय व क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta