सांगलीतील महाअधिवेशनात घोषणा : तीन वर्षासाठी निवड
निपाणी (वार्ता) : श्रावक रत्न, सहकार महर्षी, अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रावसाहेब पाटील यांची सलग चौथ्यांदा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सांगली येथे आयोजित दक्षिण भारत जैन सभेचे शंभराव्या महाअधिवेशनात उद्घाटन सत्रात त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली.
सन 20222ते सन 2025 या कालावधीसाठी त्यांची अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. नांदणी मठ येथील परमपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अध्यक्षपद घोषणेनंतर रावसाहेब पाटील यांनी पदग्रहण स्वीकारले.
सतत तीन वेळा त्यांची या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली होती. या अध्यक्षपदी काळात त्यांनी संस्कार, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांना प्राधान्य देऊन राजकारण विरहित काम केल्याने आज दक्षिण भारत जैन सभेचे कार्य संपूर्ण देशभर पोहोचले आहे. विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा शिष्यवृती योजनेतील रक्कम वाडीत यांचा सिंहाचा वाटा आहे.
सन 2010 साली पहिल्यांदा दादांनी दक्षिण भारत अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. तेव्हापासून त्यांनी सुमारे चार ते पाच कोटींहून अधिक कामे प्रगती पथावर आणले. यामध्ये श्री क्षेत्रा स्तवनिधी येथे ब्रह्मनाथ भवनाचे लोकार्पण, हुबळी येथे व्यापारी संकुले, सांगली अद्यावत सभेचे कार्यालय, महिला मंडळ ऑफिस, धारवाड येथे जागा घेणे, श्राविका आश्रम बांधकाम, वस्तीगृहे, कोल्हापूर येथे दोन मजली हॉल बांधणी असे विविध कामे हाती घेतली. त्याचबरोबर वीर सेवादल, वीर महिला मध्यवर्ती समिती, पदवीधर संघटना, जैन महिला परिषद यांच्या आर्थिक प्रगतीची साथ देऊन विविध मार्गदर्शन पर कार्य केले.
यावेळी मंत्री राजेंद्र पाटील व आमदार प्रकाश आवाडे यांनी, दादा सारख्या प्रामाणिक कार्य करणारे अध्यक्ष आपल्या सभेस मिळाले आहेत. हे आपले भाग्य असल्याचे सांगितले.
निवडीनंतर बोलताना रावसाहेब पाटील यांनी, आपण सभेच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी व समाजजागृतीचे कार्य केले आहे. उत्तम समाज घडावा, यासाठी आपण संस्कार शिक्षण व आरोग्याला महत्त्व दिले आहे. हे काम करीत असताना सर्वांचे सहकार्य मिळाले. यापुढेही आपण सर्वांच्या सहकार्याने काम करणार असून विशेषत: शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष देणार आहोत. एक लाखांहून अधिक सदस्य नोंदणी अभियान राबवणार असून दक्षिण भारत जैन सभेचे कामकाज हे देशव्यापी असावे असे यापुढे आपण कार्य करणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta