शेडची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर रोडवर असणार्या स्मशान शेडची अवस्था दयनीय झाली असून स्मशान शेडची चर्चा येथील नागरिक करत आहेत.
सध्या ही स्मशान शेड सलाईनवर असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी अनेक निवेदने देऊन देखील ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सध्या पाणी, रस्ते, गटारी यासह अन्य समस्या मोठ्या प्रमाणावर असतानादेखील स्मशान शेडची झालेली अवस्था सध्या गावातील चर्चेचा विषय झाला आहे.
स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी वारंवार सूचना देऊन देखील याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांत मोठी नाराजी पसरली आहे.
14 हजार लोकसंख्या असणार्या गावामध्ये स्मशान शेड आहेत. यातील दोन स्मशान शेड चांगल्या अवस्थेत आहेत. येथील हालसिद्धनाथ नगरकडे जाणार्या रस्त्यावर असणार्या स्मशान शेडची अवस्था गेल्या अनेक दिवसापासून बिकट झाले असून यावरील पत्रे व अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. यामुळे अंत्यविधी करण्यासाठी व्यत्यय निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने सलाईनवर असणार्या स्मशान शेड ची दुरुस्ती करून पुन्हा जीवित अवस्था निर्माण करावी अशी मागणी विरोधी ग्रामपंचायत सदस्या सह ग्रामस्थांतून होत आहे.
———————————————————–
ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा मागणी करून देखील स्मशान शेडची दुरुस्ती केली जात नाही. यासाठी आंदोलन करण्यात येईल. – स्वाती शिंत्रे ग्रामपंचायत, सदस्या कोगनोळी.
———————————————————–
ग्राम पंचायत यांच्या वतीने गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य असताना देखील त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल. – सचिन परीट सामाजिक कार्यकर्ते, कोगनोळी.
Belgaum Varta Belgaum Varta