तहसीलदारांची उपस्थिती : अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटवली
निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी ते गव्हाण हा रस्ता बर्याच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. पीएमआरवाय योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार होते. रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर गव्हाण येथील काही नागरिकांनी या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले होते. संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनातर्फे त्यांना नोटीस पाठवण्यात आली. होती तरीही त्यांनी अतिक्रमण न काढल्याने तहसीलदार डॉ. मोहन भस्मे त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात मंगळवारी रस्त्याकडेची 18 अतिक्रमणे हटविण्यात आली.
पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत पट्टणकुडी ते गव्हाण रस्ता मंजूर झाला होता. त्यानंतर जिल्हा पंचायत अभी यांच्याकडून या रस्त्याचे मोजमाप करून प्रत्यक्ष रस्ता काम सुरू केले होते. हा रस्ता थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा होता. पण गव्हाण हद्दीमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमणे करून शौचालये किराणा दुकान व भिंती उभारल्या होत्या. परिणामी रस्ता अरुंद बनल्याने रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. त्याबाबत संबंधित विभागाकडून रस्त्याचे पुन्हा मोजमाप करून मार्किंग केले होते. याशिवाय अतिक्रमण धारकांना नोटिसा पाठवून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही संबंधित आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलीस प्रशासनातर्फे मंगळवारी एका किराणा दुकाना सह रस्त्याव अतिक्रमण केलेले शौचालय व घरांच्या भिंती जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. त्यामुळे काही काळ गव्हाण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तहसीलदार डॉ. भस्मे व मंडल पोलीस निरीक्षक संगमेश्वर शिवयोगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासकीय अधिकार्यासह पोलीस आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta