दिवंगत नितीन शिंदे जयंतीचे निमित्त : शिंदे परिवारातर्फे आयोजन
निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती सोमनाथ शिंदे यांनी दिली. विश्वास फार्मा कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत.
या स्पर्धेमध्ये स्थानिक पातळीवरील सहा संघांचा सहभाग राहणार आहे. त्यामध्ये जत्राटवेस टीम लोकेश, छत्रपती शिवाजी चौकातील रायझिंग स्टार क्लब, साखरवाडी तील फुटबॉल क्लब, दिवंगत विश्वासराव शिंदे शिवछत्रपती तरुण मंडळ, महादेव गल्लीतील एस. पी. ग्रुप आणि शिवाजी नगरातील छावा ग्रुप संघाचा समावेश आहे. सहभागी संघांना स्पर्धेत विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
दिवंगत नितीन शिंदे यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिंदे परिवारातर्फे या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तरी शहर आणि परिसरातील फुटबॉल प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सोमनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी ओंकार शिंदे, राहुल शिंदे, सचिन फुटाणकर, प्रतीक शहा, जाॉन मधाळे, प्रशांत आजरेकर, गणेश घोडके यांच्यासह निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta