सौंदलगा : येथील जागृत देवस्थान श्री लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आज गुरुवार पासून सुरुवात होत असून गुरुवार ता. 19 रोजी सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी देवीची स्थापना व पुजा मंदिरामध्ये होणार असून यानंतर या दिवशी दिवसभर गोडा नैवेद्य ग्रामस्थ कडुन दाखवण्यात येणार आहे.
शुक्रवार ता. 20 रोजी सकाळी 8 वाजता श्री रेणुकादेवी माळावरती श्री लक्ष्मी देवीची स्थापना व पूजा त्यानंतर खारा नैवेद्य घरातूनच भाविकांनी दाखवायचा आहे.
शनिवार ता 21 रोजी संध्याकाळी श्री लक्ष्मी देवीची पाठवणी करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस गावांमध्ये पाळक पाळण्यात येणार आहे. असे श्री लक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta