निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार व कर्नाटक राज्य ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यामार्फत कंठीरवा इंडोर स्टेडियम बेंगलोर येथे दिनांक 16 मे ते 22 मे पर्यंत दुसरी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तायक्वांदो, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, जुडो, फेन्सिंग अशा खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी या खेळांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवले.
39 किलो वजन गटात शर्वरी फुटाणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर मुलांच्या 37 किलो वजन गटात कार्तिक चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांना कर्नाटका ऑलिम्पिक असोसिएशन यांच्याकडून मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये समर्थ निर्मले, अपूर्वा पवार, वेदकुमार कांबळे, तनिष्क मुरगली, शांभवी कारंडे, यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदोचे मुख्य प्रशिक्षक बबन निर्मलेसह प्रशिक्षक गणेश हुलकंती, अनुष्का चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
