आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम
निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, व्हॉलीबॉल ग्रुप व जायटंस ग्रुप ऑफ निपाणी यांच्या संयुक विद्यमाने शेतकरी हुतात्मा स्मारक आंदोलननगर येथे वृक्षारोपण करून तंबाखू आंदोलनात शहीद झालेल्यांचे स्मरण करण्यात आले आले. त्यावेळी प्रा. डॉ. माने बोलत होते.
प्रारंभी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येऊन वृक्षारोपण झाले. यावेळी हुतात्म्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक निकु पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एन. आय. खोत, अभियंते बी. बी. बेडकिहाळे माजी नगरसेवक दिलीप पठाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश भोईटे, उपाध्यक्ष सुरेश घाटगे, सेक्रेटरी महादेव बन्ने, मनोहर जाधव, वसंत धारव, पुंडलिक कुंभार, नारायण यादव, व्हॉलीबॉल क्लब, जायटंस ग्रुप, फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपास्थित होते.
Check Also
सत्तास्थान नसतानाही विकासकामांसाठी प्रयत्नशील; नगरसेवक शौकत मणेर
Spread the love निपाणी (वार्ता) : नगरपालिकेत गेल्या ६ वर्षांपासून कोणत्याही सत्तास्थाने नसतांना प्रभाग क्र. …