सौंदलगा : पर्यावरण दिनानिमित्त पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, वीरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा शितोळे यांनी सर्वांचे स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या दृष्टिकोनातूनच आम्ही आज चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण करणार आहोत. आजपर्यंत एक लाखाच्यावर चंदन झाडे लावण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यातूनच आज आम्ही एपीएमसी सदस्य संजय शिंत्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करणार आहोत. यानंतर संजय शिंत्रे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी एपीएमसी सदस्य संजय शिंत्रे म्हणाले की, या वर्षी पर्यावरण दिनाचे ब्रीद वाक्य, “केवल एक पृथ्वी” हे असून पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण करणे, पर्यावरणाची सुरक्षा ठेवणे हे महत्त्वाचे आहे. यावेळी बोलताना जे.डी. शिंदे म्हणाले की, पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, विरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी, हुडको कॉलनी निपाणी येथून आम्ही पर्यावरण दिनानिमित्त अभ्यास दौरा आयोजिला होता. आडीमल्लया डोंगरावरती निसर्गाची पाहणी केली. व आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. पुढील पिढीसाठी पर्यावरण टिकवणे महत्त्वाचे आहे. शेवटी जगातील पहिला असा रियल चंदनाचा चंदन चहाचा आस्वाद सर्वांनी घेतला. यावेळी अविनाश शिंत्रे, प्रभाकर पाटील, शंकर हिरेमठ, रामचंद्र नेजे, रावसाहेब हुन्नरगी, एम.एस. पाटील, सदानंद शिंदे, कविता नागरगट्टी, ज्योती सदलगे, सुमन किर्तने, सरस्वती शिंत्रे, बंडा हातकर, केदारी माळी, सर्जेराव साळुंखे, रघुनाथ मोरे, उमेश कासार यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. सौदलगा, फोटो : चंदन झाड लावताना संजय शिंत्रे जे.डी. शिंदे, कृष्णा शितोळे व इतर मान्यवर