कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोगनोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रवींद्र देसाई यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी सतीश पाटील, भीमराव शिंदे, अभिजीत मगदूम, निलेश साखरे, सागर पाटील यांच्यासह शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
