खाटीक समाजाची बैठक
निपाणी (वार्ता) : येथील खाटीक समाजाचे हडप केलेले समाजाच्या मालकीचे व गरीबांच्या हक्काचे भूखंड परत मिळविण्यासाठी समाजाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पोटशूळ उठून समाजाची दिशाभूल करण्याचे काम समाजातील काढून विघ्नसंतोषी मंडळींकडून सुरू आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. रविवारी (ता. 19) श्री बिरदेव यात्रा व त्यानंतर रविवारी (ता.3 जुलै) समाजाची सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती खाटीक समाजाचे उपाध्यक्ष रविंद्र घोडके यांनी दिली. श्री बिरदेव मंदिरात आयोजित समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
विरोधकांनी केलेल्या आरोपांविषयी बोलतांना घोडके म्हणाले, सर्व समाजाच्या उपस्थितीतच झालेल्या सर्वसाधारण सभेत आपल्या संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर समाजाचे काम सर्वांनी एकजुटीने व प्रामाणिकपणे केले. मंदिरात भाविकांकडून विकासकामे करीत असतांना थेट भाविकांनाची ती करावयास दिली आहेत. मंदिर परिसराच्या विकासात जोल्ले उद्योग समुहाने मोलाचे सहकार्य केले आहे. तर महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही हातभार लावला. हे करीत असतांना त्यांचा निधी त्यांनीच मंदिराच्या कामासाठी खर्च केला आहे. तमंदिरातील इतर कामेही भाविकांनी स्वखर्चातून केली आहेत. त्यामध्ये संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही. 1983 साली समाजाची 7.27 एकर इतकी जागा समाजातील गरीब, बेघरांना मिळवून देण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळातील अशोक इंगवले व अशोक कांबळे यांच्या स्वाधीन केली. मात्र याकामी त्यांनी समाजाशी दगा करून सदर जागा समाजाला परत न करता त्याची परस्पर विक्री, विल्हेवाट लावली. त्यामुळे त्या जागेपासून समाज वंचित राहिला. अशोक कांबळे नगरपालीकेत सभापती असतांना त्यांनी मंदिरालगतची 10 गुंठे जागा नगरपाीलिकेला तशीच देवून समाजाचे नुकसान केले. चिकोडी रोड येथे असणार्या जागेची परस्पर विक्रि केली आहे. समाजातील गरीब लोकांना जमिन देण्याचे आमिष दाखवून रक्कमा हडप केल्या. मंदिरालगतची 4 गुंठे जागा विकण्याचा प्रयत्न केला गेला. खाटीक समाजाच्या भाड्याचा हिशोब दिला नाही. या सर्व प्रकाराची दखल घेत आमच्या संचालक मंडळाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून जमिन परत मिळविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पोटशूळ निर्माण झाल्याने त्यांच्याच वारसांकडून विद्यमान संचालक मंडळाविरोधात खटाटोप सुरू आहे. त्यांच्याकडून बोलविण्यात आलेल्या 13 रोजीच्या सर्वसाधारण सभेशी समाजाचा काडीमात्रही संबंध नाही. त्यांच्यात हिम्मत असेल तर, त्यांनी 3 जुलै रोजी बोलाविण्यात आलेल्या समाजाच्या बैठकीप्रसंगी सामोरे येवून प्रश्ने उपस्थित करावी. त्याचा जबाब देण्यास आम्ही समर्थ आहोत. आपली निवड ही लोकनियुक्तच असून त्यांनीच स्वयंघोषीत संघटना स्थापन केली आहे. त्याच्याशी समाजाचा कोणताही संबंध नाही. त्यांच्या या समाजाच्या दिशाभूल करणार्या भुमिकेमुळे समाजाला मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
मंदिराची विकासकामे खुंटली आहेत. अशी वस्तुस्थिती असतांना समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना उत्तरे न देता आल्यानेच दिशाभूल करून शिंथोडे उडविण्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या 40 वर्षांपासून समाजाला लुटण्याचे काम केले गेले आहे. त्यांच्यापासून समाजाला वाचविण्यासाठी आपले काम सुरू करावे. अजूनही सर्वांनी एकाच छताखाली येवून समाजाच्या सर्वांगीण हितासाठी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष धनाजी क्षीरसागर, संजय चिकोडे, राजेश शेडगे, बाबासाहेब घोडके, सुधाकर घोडके, नंदकुमार घोडके, सुनिल काळगे, राजेश क्षिरसागर, सुनिल जोरापुरे, राजेंद्र कांबळे, शिवाजी घोडके, बाळासाहेब गायकवाड, दिगंबर शखरबिद्रे व समाजबांधव उपस्थित होते. अनिल फुटाणकर यांनी आभार मानले.
