Sunday , September 20 2026
Breaking News

आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात

Spread the love

आजरा : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय 54, रा. योगायोग नगर, पुजारी मळा इचलकरंजी), तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (वय 52 रा. पेद्रवाडी ता. आजरा), स्टोअर किपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे (वय 53 रा. चांदेवाडी ता. आजरा), सुरक्षा मुख्यााधिकारी भरत गणपती तानवडे (वय 62 रा. देवर्डे ता. आजरा), सुरक्षा रक्षक मनोहर यशवंत हसबे (वय 49 रा. चांदेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या चोरी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आणखी काहीजण संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यासंदर्भात योग्य ते पुरावे हाती लागाताच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
आजरा साखर कारखाना दोन हंगाम बंद होता. 17 फेब्रुवारी 2019 ते 26 जुलै 2021 या काळात कारखान्यातील सहा बेअरिंगची चोरी झाली. यामध्ये 270 किलोच्या चार तर 92 किलोच्या दोन बेअरिंगचा समावेश होता. सहा बेअरिंगची किंमत 3 लाख 5 हजार 200 रूपये आहे. गेल्या एक वर्षापासून या प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून 34 जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर कारखाना कामगार संघटना व इतरांच्या निवेदनामुळे चोरी तपास प्रकरणाला वेग आला. अखेर गुरूवारी मध्यरात्री 12 वाजून 16 मिनिटांनी पाच संशयितांना आजरा पोलीसांनी ताब्यात घेतले, असल्याची माहिती आजर्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

साहित्यरत्न, विचारवंत कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव कोल्हापूरात सन्मानित

Spread the love  कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *