कुर्ली हायस्कूलमध्ये समुपदेशन
निपाणी (वार्ता) : विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातला बहुतांश वेळ शिक्षकांसोबत व्यतीत करतात. पालकांसोबत ते अगदी थोडा वेळ असतात. शिक्षणात विद्यार्थांच्या जडणघडणीच्या दृष्टीने ज्या मूलभूत गोष्टींची कमतरता आहे, हे अभ्यासणे गरजेचे आहे. सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात असल्याचे मत सुरत मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. श्रेयांन्स निलाखे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यक्तीमत्व विकास समुपदेशन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते. सुरत येथील आहारतज्ज्ञ रूपाली निलाखे प्रमुख पाहुण्या होत्या.
प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. रोपास जलार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आहारतज्ज्ञ रूपाली निलाखे यांनी, शालेय जीवनात समतोल आहार आहार व योग याचे प्रत्यक्षिकासह महत्व विशद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे समर्पक निरसन केले.
याप्रसंगी टी. एम. यादव, एस. ए. पाटील, एस. जी. लिंबीगिडद, डी. डी. हाळवणकर, आर. आर. मोहिते, यु. पी. पाटील, विजय साळुंखे, यांच्यासह सेवक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवे यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
