कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील गावकामगार पोलीस पाटील मधुकर दत्तात्रय पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीची पूजन चंद्रकांत सदाशिव डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. केरबा तुकाराम बेडगे यांच्या हस्ते फीत कापून करीची सुरुवात करण्यात आली.
बैलांची सवाद्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढून कर तोडणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
कर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शौकिनांनी गर्दी केली होती.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे, रंगराव केसरकर, तानाजी वाळके, महादेव माने, सुनील वाळके, परशुराम कदम, शिवाजी केसरकर, मानकरी सदाशिव केसरकर, बजरंग माने, विलास मोरे, तानाजी साठे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta