एस. एस. चौगुले : कुर्ली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन
निपाणी (वार्ता) : दररोज योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते, असे मत सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे आयोजित कार्यक्रमात विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
डी. डी. हाळवणकर यांनी स्वागत केले. योग शिक्षक अशोक माने यांनी योग व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक दाखवत त्याचे फायदे व महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी एस. ए. पाटील, एस. जी. लिंबिगीडद, यु. पी. पाटील, आर. आर. मोहिते, विजय साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले तर टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Check Also
गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
Spread the love कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक …