Monday , December 8 2025
Breaking News

विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया

Spread the love
नूतन मराठी विद्यालयमध्ये उपक्रम : गुप्त पद्धतीने मतदान
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित नूतन मराठी विद्यालय मध्ये सन 2022-23 मधील विध्यार्थी प्रतिनिधी पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. यावेळी उमेदवारांनी एक दिवस अगोदर उमेदवारी अर्ज मुख्याध्यापक एस. एस. पचंडी यांच्याकडे जमा केले होते. ईव्हीएम मशीनची माहिती दिली. बॅलेट पेपरला फाटा देत मोबाईलमध्ये ईव्हीएम ॲप घेऊन मतदान प्रक्रिया करण्यात आली. यावेळी चौथी पासून दहावी पर्यंत एकूण 36 उमेदवार निवडणुकीसाठी उभारले होते. दुपारी मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समर्थ माने तर विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी महणून भूमी खोत निवडून आले तसेच वर्ग प्रतिनिधी म्हणून सोहम शेळके, मंथन जगदाळे, स्मिता बागणे, तनया गोडसे यश कांबळे, प्रसाद शिंदे, शामबाला बाळमारे, प्रथमेश कांबळे, मंथन कासोटे, श्रीनिल कांबळे हे विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी एस. आर. चव्हाण, एम. डी. खोत व यू आर पवार यांनी घोषणा केली.
यावेळी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, एस. बी. पवार, यू. वाय. आवटे, एस. एस. कुलकर्णी, ए. एम. कुंभार, व्ही. बी. पाटील, एस. आय. किवंडा यांनी काम पाहिले.  संस्थापक अध्यक्ष  प्रा. चंद्रहास धुमाळ, प्राचार्य ए. सी. धुमाळ, संचालक विक्रमदित्य धुमाळ यांनी विजयी उमेदवारचे अभिनंदन करून सत्कार केला.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *