निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार 500 रुपये आणि बँक ऑफ इंडियाकडून 2 लाख रुपये मंजूर झाले होते. सदरच्या रकमेचा धनादेश शैलेश पारधे यांच्या पत्नीच्या नावे देण्यात आला. तसेच रिक्षा संघटनेकडून 5 लाख रुपयेची विमा रक्कम चार दिवसात वारसांच्या नावे जमा होणार आहे. या कामासाठी बेळगाव येथील मुचंडी मधील संतोष चौगुले, संघटनेचे कायदे सल्लागार अॅड.प्रवीण जोशी, रिक्षा असोसिएशन, निपाणी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक, मंडल पोलीस निरीक्षक, प्रादेशिक वाहतूक खात्याचे निरीक्षक यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta