सौंदलगा : सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यास ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला वारकरी संप्रदाय व भाविकांकडून पंचपदी म्हणण्यात आली. त्यानंतर वाहनाचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री विठ्ठल मंदिरात आरती होऊन दिंडीस सुरुवात झाली. यामध्ये वारकरी, महिला, युवक मोठ्या प्रमाणात होते. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा, तुकाराम, राम- कृष्ण- हरी चा गजर करीत व अभंग म्हणत भक्तीमय वातावरणात गावातील प्रमुख रस्त्यावरून दिंडी निघाली. यावर्षी या दिंडीचे सतरावे वर्ष असून दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्या कारणाने दिंडी पंढरपुरास गेली नव्हती. त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक सहभागी झाले होते.
या दिंडीमध्ये शशिकांत पाटील, आप्पा पाटील, नामदेव सांगावे, चंद्रकांत पाटील -कोठावळे, बाबुराव हातकर, पांडुरंग पाटील, धोंडीराम बावचे, धनाजी कोठावळे, धोंडीराम चिखले, केशव मेस्त्री यासह भाविक, वारकरी मोठ्या प्रमाणात आषाढी वारीत सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta