कोगनोळी : जायंट्स ग्रुप ऑफ कोगनोळी व मन्सूर शेंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये क्रीडा साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष आप्पासाहेब माने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोगनोळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष जगन्नाथ खोत, उपाध्यक्ष विलास माने, पीआरओ अभिजीत चिंचणे, सचिव उदय मोनाप आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विलास गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी जगन्नाथ खोत, आप्पासाहेब माने, मन्सूर शेंडूरे आदींनी आपल्या मनोगतातून जायंट्स ग्रुप ऑफ कोगनोळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी मुबारक नाईकवाडे, जी. एस. खनगावकर, जी. के. जोके, एम. सी. कुंभार. एस. एस. मगदूम, एम. एच. कोरव, एस. बी. कांबळे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. बाळासो कागले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta