मॉडर्न स्कूलचा उपक्रम : ‘डॉक्टर्स डे’ चे निमित्त
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉ. संदिप चिखले व डॉ. त्रिवेणी चिखले यांच्या मुलाखती घेवून डॉक्टर्स डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे तर मुख्य अतिथी म्हणून डॉ. संदिप चिखले व डॉ. त्रिवेणी चिखले या दाम्पत्यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉक्टर दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ऐश्वर्या कोळकी, विश्वजीत कांबळे, पृथ्वीराज पोटे व अदिती रावण या विदयार्थ्यांनी डॉक्टरांना विविध प्रश्न विचारून मुलाखत घेतली. डॉ. संदीप चिखले यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्यांनी डॉक्टरी पेशा कसा निवडला गेला. गरिब परिस्थिती मध्ये घेतलेले शिक्षण, त्यासाठी केलेले कष्ट याची माहिती सांगितली. दैनंदिन जीवनात मानसिक व शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त राहण्यासाठी अनेक सल्ले डॉक्टरांनी दिले. डॉ. त्रिवेणी चिखले यांनी, मुली आणि महिलांचे आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी, आरोग्यवान मानवी जीवनातील महत्व सांगत डॉ. चिखले यांच्या कार्याचा आढावा घेतला. गरिब आणि आजारी रुग्णांचा मोफत इलाज करणारे मानवधर्म सांभाळणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख करून दिली. पार्थ पाटील याने सूत्रसंचालन केले तर संकल्प मन्नोळी याने आभार मानले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta