Share
कोगनोळी : आप्पाचीवाडी (तालुका निपाणी) येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात एकाचा मृतदेह आढळला. राजेंद्र कृष्णात चव्हाण (वय – ४२, रा. आडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.
राजेंद्र चव्हाण हा शनिवारी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिरासमोरील बसस्थानकात झोपलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आला.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी नितीन किल्लेदार यांनी फिर्याद दिली.

Post Views:
531
Belgaum Varta Belgaum Varta