निपाणी (वार्ता) : येथील नगरनियोजन समितीच्या सदस्यपदी शासनावतीने नियुक्त करण्यात आलेले सदस्य विश्वनाथ जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. येथील गुडमॉर्निंग वॉकिंग ग्रुप वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी निपाणी नगरपालीकेचे माजी सभापती संदीप कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या पदाच्या माध्यमातून शहराच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही जाधव यांनी दिली. यावेळी प्रभाकर पाटील, संजय चोरगे, वसंत नगरे, सुर्यकांत जांभळे, विलास पाटील, सुरेश खवरे, सुरेश सुतार, दादासो खोत यांच्यासह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta