दर्शनासाठी भाविकांची गर्दी : ठिकाणी खिचडीचे वाटप
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात रविवारी (ता.१०) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली त्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले.
श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच वाजता श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते विधीपूर्वक अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर जमलेल्या सर्व वारकरी व भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारकरी मंडळी व युवा मंडळींनी परिश्रम घेतले. आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला होता.
येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्सवानिमित्त
पहाटे ५.३० वाजता काकड आरती झाली. पहाटे सहा वाजता श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, तहसिलदार मोहन भस्मे, प्रा. चंद्रहास धुमाळ दांपत्य, हरिष देसाई, प्रकाश कांबळे, पांडुरंग व्हटकर यांचे हस्ते अभिषेक घालण्यात आला.
सकाळी आठ वाजता समाधी मठाचे मठाधीश प्राणलिंग स्वामींच्या उपस्थितीत महाआरती व विठ्ठल नामाचा जयघोष केला.
यावेळी श्रेणीक कमते यांनी देवीस सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. पांडुरंग व्हटकर यांनी आकर्षक प्रभावळ अर्पण केली.
त्यानंतर मंदिरातील फरशी बसविण्यासाठी सहाय्य केलेले धनाजीराव।धुमाळ, चंद्रहास धुमाळ, अनुराधा सवदी यांचा सत्कार रामचंद्र पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळी ८.३० पासून दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आला.
दिवसभरात विविध भजनी मंडळांनी भजन सेवा केली.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ व भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी संजय कमते, विठ्ठल जाधव, राजू ठाणेकर, राजू साळूंके, अभिनंदन भोसले, किरण रेपे, दिपक चव्हाण, दत्ता कमते, शंकर बड्डे, आकाश सुतार यांनी परिश्रम घेतले. मंदिराचे अध्यक्ष बाबुराव महाजन यांनी आभार मानले.