कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला.
सकाळपासूनच विठ्ठल कोळेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतक सभासद नागरिक यांनी गर्दी केली होती.
येथील गर्ल हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल येथे विठ्ठल कोळेकर यांचा पांडुरंग काजवे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
हालसिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक रत्नदीप चौगुले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात विठ्ठल कोळेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना विठ्ठल कोळेकर म्हणाले, आतापर्यंत आपल्याला सर्व चांगल्या लोकांचे मार्गदर्शन लाभल्यानेच आपण चांगले काम करू शकलो आहे. पतसंस्था व शैक्षणिक विभाग बघत असताना अनेक लहान मोठ्या लोकांचे आपल्याला मार्गदर्शन व मदत झाली आहे. भविष्यातही आपण शाळा व बँकेच्या माध्यमातून लोकांच्या सोयीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूची भेट, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट यासह अन्य उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, डॉक्टर अमोल गाडवे, डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, उद्धव काजवे, राजाराम चौगुले, देऊ कोळी, रामचंद्र बिद्रोळे, अमोल कोळी, अभिजीत गायकवाड, अविनाश आलासे, कस्तुरी कोळेकर, साधना पाटील, मालुबाई कोळेकर, सिद्धू कोळेकर, पत्रकार अनिल पाटील, अजित चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …