निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११) द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, श्रद्धा गुळगुळे, सुनील कोपर्डे, नगरसेविका प्रभावती सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, सोमनाथ शिंपूकडे, सुनील कांबळे, राजू माने, टाऊन प्लॅनिंगचे सदस्य विश्वनाथ जाधव, अनिरुद्ध चावरेकर, संतोष कोरदाले, अण्णासाहेब कुऱ्हाडे, कल्पना बोंगळे, जया खाडे, सरस्वती कोपार्डे, सविता कुंभार, आवनाबाई येरुडकर, दिलीप कागिनकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. विशाल राऊत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta