तहसीलदारांना निवेदन : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
निपाणी : शहर व ग्रामीण भागात हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेची हत्या रोखण्यात यावी. यासाठी हिंदुत्ववादी युवकांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले. यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदनामधील माहिती अशी, काही धर्मांध लोक हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच प्रतीक असलेल्या गाईची हत्या करतात. हे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम आहे, यामुळे हो मातेची कत्तल रोखवी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने म्हणाले, गाय ही आरोग्याचा विषय आहे. गाईमुळे असंख्य फायदे मानवी जीवनाला होत असतात पण काही लोक गाईची हत्या करत आहेत, हे थांबणे गरजेचे आहे. अमोल चेंडके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय चिकोडे, ऋतिक तनपुरे, आदर्श पांडव, सुशांत कांबळे, बबन निर्मळे, अमर रजपूत, सागर श्रीखंडे, अजित पारळे, राकेश ताते, ओम माने यांच्यासह युवक उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta