निपाणी : येथील विद्या संवर्धक मंडळाचे व हालशुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्नाटक साहित्य परिषद व राज्य शिक्षक, सहशिक्षक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आला.
यानिमित्ताने येथील कर्ण बधीर, मूक बधीर नितीन कदम विद्यालय, एचआयव्ही बाधित – मुलांचे आश्रम, महात्मा गांधी रूग्णालयात फळे वितरण तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर संघटनेच्या व संस्थेच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उच्च विद्याभ्यासासाठी आवश्यक महागड्या पुस्तके गरजूंना उपलब्ध करून देण्याकरिता चंद्रकांत कोठीवाले ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. याप्रसंगी वाय. बी. हंडी, डी. यु. नाईक, सतीश भगाडे यांच्यासह शिक्षक, मान्यवरांची उपस्थिती होती.
