कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.
दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला आहे.
नदीकाठी असणार्या शेतीमध्ये पाणी गेल्याने शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील गटारी व ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सुरु झालेला हा मान्सून पाऊस कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यानेच दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कोगनोळी व परिसरामध्ये राहून राहून मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. आणखी दोन-चार दिवस असाच पाऊस राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी लगतच असणार्या गावाशेजारील वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
परिसरात सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे जिथल्या तिथे थांबले आहेत. सध्या परिसरामध्ये सोयाबीन भुईमूग ऊस पीक जोमात आले असून पडणारा पाऊस या पिकांसाठी उपयुक्त असला तरी शेतीची अंतर मशागतीची कामे खोलांबली आहेत.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून नदीकाठी असणार्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी पाणी पातळीत वाढत होत चालली आहे. सन 2021 सालामध्ये झालेल्या पावसामुळे व दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोकांना स्थलांतर करावे लागले होते. सध्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिसरातील लोकांना पुन्हा स्थलांतर करावे लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …