उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर : इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लब पदाधिकार्यांची निवड
निपाणी (वार्ता) : समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. अन्यायाविरोधात कारवाई करताना पोलिसांना समाजातील सुज्ञ नागरिकांची मदत महत्त्वाची ठरते. समाजात होणार्या अन्यायाला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्याया विरोधात होणार्या प्रत्येक बाबीला आपला सदैव पाठिंबा असेल, अशी ग्वाही उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी दिली. येथील इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेन ग्लोरीच्या नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जे. व्ही. गुदगन्नावर यांनी स्वागत केले केले. गुर्लहोसूर म्हणाल्या, व्यसनाधिनतेच्या अतिरेकामुळे समाज असुरक्षित बनत चालला आहे. लैंगिक शोषण सहन करत जीवन जगणार्या महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची गरज असताना मुकाटपणे अन्याय सहन केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. घडणार्या अनूचित प्रकाराला रोखण्यासाठी जागृती महत्त्वाची आहे. कुटुंबाची जबाबदारी पेलताना योग्य संस्कार व विचारातून पाल्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी महिलांवर आहे. मोबाईल व इंटरनेटच्या विळख्यात सापडलेल्या महिलांनीआता सजगतेने राहण्याची गरज आहे. विविध आमिषांना बळी पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे. क्लबचे सदस्यत्व स्वीकारून गुर्लहोसूर यांनी आपणही या क्लबच्या माध्यमातून नेहमी कार्यरत राहणार असल्याचीही ग्वाही दिली.
यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी स्नेहा संकपाळ, सचिवपदी रश्मी हिरेकुडी, खजिनदारपदी वैष्णवी करवा, आयएसओ शिल्पा रोकडे, एडिटर ज्योती किनिंगे व डॉ. सायली प्रभू यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहा म्हणाल्या, संकपाळ क्लबच्या विकासासाठी यापुढे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुष्पा कुरबेट्टी, निवेदिता सोलापूरकर, जयश्री गुदगन्नावर, रोटरीचे अध्यक्ष दिलीप पठाडे, निलम ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मयुरी पाटील, मानसी कुरबेट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta