राजू पोवार : गोकाकमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सरकारच्या मारक धोरणामुळे शेतकरी अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वेमध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकर्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. त्यामुळे सर्वांनी संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केले. गोकाक येथे आयोजित रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते. त्यानंतर एपीएमसी आवारात जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्याचा शेतकर्यांचा मेळावा पार पडला. या वेळी पोवार म्हणाले, गुरुवारी (ता.21) हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव येथे हुतात्मा शेतकर्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
राज्य गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी स्वागत केले. त्यानंतर संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी या पुढील काळात संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे राज्य गौरव अध्यक्षपदी शशिकांत पडसलगी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, राज्य संचालक गणेशटूडगेर, धारवाड जिल्हा अध्यक्ष शिवानंद मायकार, कलघटगी तालुका अध्यक्ष शिवनगौडा शिंदोळी, गंगाधर दोडवाड, लिंगाप्पा पुजार, श्रीशैलगौडा नाईक, गोकाकमधील गणेश ईलीगार, वासू पांढरोळी, सत्याप्पा मल्लापुर, इराण्णा ससालट्टी, मंजू पुजेरी, शिवु इलिगार, कुमार तिगडी, पांडू बिरनगड्डी, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, जैनवाडीचे नामदेव साळुंखे, सुभाष नाईक, राहूल हवालदार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta